HW News Marathi
मुंबई

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारणारी भाषा ही मराठीच होती

मुंबई | विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या राज्य विधीमंडळाचे अर्थसंक्लपीय अधिवेशन सुरु आहे. विधान भवनाच्या प्रांगणात आज (२७ फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि विरोधकांनी एकत्र मिळून मराठी भाषा दिन साजरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मराठी भाषेची संस्कृती, परंपरा यावर भाष्य केले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. ज्या विधान भवनात सगळे पक्ष एकमेकांविरुद्ध भांडण करतात तेच सगळे पक्ष आज एकत्र येऊन आईचा सन्मान करत आहेत याचा मला आनंद आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. टाळ मृदुंगाच्या वादनाने विधान भवनात मराठी भाषा दिन साजरा केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंची भाषा ही मराठी आहे. ज्या संस्कारातून स्वराज्य उभारलं तीच भाषा मराठी आहे. अशी आपली मराठी भाषा असल्याचे उद्धव यांनी आपल्या भाषणात म्हटले.

मराठी भाषा दिनासाठी फक्त एकच दिवस का असा प्रश्नही यावेळस त्यांनी उपस्थित केला. मराठी ही शक्तीची अन् भक्तीची भाषा आहे. इंग्रजांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न विचारणारी भाषा ही मराठीच होती. आपली मराठी, मराठीची संस्कृती टिकविण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. मराठी भाषेचा कायदा करण्याचा योगायोग माझ्या काळात आला हे माझे भाग्य की नाईलाज मला माहित नाही. मात्र, माझ्या माईने माझ्याकडून अ.. आ..ई… पाटीवर गिरविलेले मला आठवलें, जे कुणीही कोणीही कधीही मनातून पुसू शकत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये आगीचे तांडव

News Desk

दिवा रेल्वे स्थानकात प्रवाश्यांचं आंदोलन

News Desk

नालेसफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष, धारावीतील शेटवाडी नाला गाळ कच-याने तुडुंब

News Desk