HW News Marathi
मुंबई

मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई । मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज (२४ फेब्रवारी) मेगाब्लॉक घेतला आहे. आज सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ दरम्यान मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आली आहेत. त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर लोकल उपलब्ध नसतील. रविवारी जलद लोकल ट्रेनला अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. परिणामी अप आणि डाऊन लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने धावतील.

बॉल दरम्यान मध्य रेल्वेवर पूल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान कर्जत-खोपोलीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात कर्जत-खोपोली मार्गावरील ३ अप आणि ३ डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान हार्बर रेल्वेने सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या वेळेत सीएसमटी-चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी मार्गावरील लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद असल्याची माहित रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. ब्लॉक काळात कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वरून पनवेलसाठी विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

swarit

महापालिका अधिकारी बिल्डरच्या खिशात?, करीरोडचा पूल धोक्यात

News Desk

महापालिकेच्या पत्रकार कक्षाला कुलूप, मनसेचा पालिकेत धिंगाणा

News Desk