HW News Marathi
मुंबई

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई | मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ दुरुस्ती आणि ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी आज (१९ मे) दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर १८ मे आणि १९ मे रोजी रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात आल्याने दिवसकालीन ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड ते माटुंगा सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.२६ ते दुपारी २.४८ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉकदरम्यान दिवा ते परळ या सर्व स्थानकांवर लोकल ट्रेन थांबणार आहेत. परळनंतर त्या जलद मार्गावर चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी ते दादर पॅसेंजर दिवापर्यंत चालविण्यात येईल. तर गाडी क्रमांक ५०१०३ दिवावरून चालविण्यात येईल. मेल, एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी दादर ते दिवादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येईल. ती दादरहून दुपारी ३.४० वाजता सुटेल.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून चुनाभट्टी, वांद्रे दिशेकडे जाणाऱ्या सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत चुनाभट्टी, वांद्रेहून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी, वडाळा रोडहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तसेच सकाळी ९.५६ ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावसाठी एकही लोकल धावणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्टिक बंदी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

News Desk

साडेपाच वर्षाच्या मुलाला सावत्र बापाने दिले चटके

News Desk

विमानतळ नामकरणाचा वाद, सेनेने थोपटले दंड

News Desk