HW Marathi
मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर आज (३१ मार्च) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि गोरेगाव असा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर काल (३० मार्च) रात्री ११ वाजल्यापासून ते आज (३१ मार्च) सकाळी ६ वाजेपर्यंत माहिम ते वांद्रे दरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

असा असणार तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक 

 

मध्य रेल्वे

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर आज सकाळी १०.४७ वाजल्यापासून ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ब्लॉकदरम्यान मुलुंड ते कल्याण लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. तसेच या लोकलला ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या कालावधीत कल्याण स्थानकावरील कसारा दिशेकडील पादचारी पूल पाडण्याचे काम करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी (३० मार्च) रात्री ११ ते रविवारी (३१ मार्च)  सकाळी ६ वाजेपर्यंत माहिम ते वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर असा ७ तासांचा रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या रात्रकालीन ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावरील पायाभूत कामे केली जातील. ब्लॉकदरम्यान सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल मार्गादरम्यान जलद मार्गावरून लोकल चालविण्यात येतील. त्यामुळे माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांवर लोकलला थांबा दिला जाणार नाही.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटी स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० वाजल्यापासून ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत लोकल सेवा बंद असणार आहे. सीएसएमटीहून वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी चालविण्यात येणारी लोकल सेवा सकाळी ९.५६ पासून ते दुपारी ४.१६ वाजेपर्यंत बंद असणार आहे.

Related posts

मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीत नपुंसकता वाढली

News Desk

दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या हत्येच्या कटप्रकरणी प्रिती जैनसह दोघं दोषी

News Desk

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk