HW News Marathi
मुंबई

बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता

मुंबई | बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबईमध्ये सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज (९ जानेवारी) गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली.

बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता मंगळवारी (८ जानेवारी) संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी प्रस्तावित संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात आल्या असून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार आता बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संप ज्यावेळी मागे घेतला जाईल. त्यावेळी ही अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेत सुधार समितीच्या माध्यमातून २ लाख कोटींचा घोटाळा – नवाब मलिक

News Desk

हिंदुजा महाविद्यालयाला अवैध पार्किंगचा विळखा, वाहतुक पोलिस शाखा बघ्याच्या भुमिकेत

News Desk

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

News Desk