HW News Marathi
मुंबई

मित्रानेच केला मित्राच्या पत्नीवर कु-हाडीने हल्ला

पुणे कारवाडी परिसरात महिलेवर एक तर्फी प्रेम करणा-या तरूणाने कु-हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली असून या घटने महिला गंभीर जखमी झाली आहे, याप्रकरणी भेसरी पोलिसांनी सुभाष लांडगेच्या विरोधात गुन्हा दाखल केली आहे. प्रेमी आरोपी फरार असून पोलिस त्याचे शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला

रविवारी सकाळी कामावर जात असताना आरोपी सुभाष लांडगे याने महिलेवर कु-हाडीने आठ ते नऊ वार केले. आरोपी हा महिलेच्या नव-याचा मित्र आहे. त्यामुळे सुभाष लांडगेचे त्यांच्या घरी येणे-जाणे रोज होते. यातूनच त्याला मित्राची पत्नी आवडू लागली. पुढे मित्राची पत्नी आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेत यासाठी तो जबरदस्ती करू लागला. मात्र तिने नकार दिल्याने सुभाष लांडगेने महिलेवर कु-हाडीने वार करत हल्ला केला. यात हल्ल्यात महिला जखमी झाली असून स्थानीकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली . पुढील तपास पोलिस करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसने उंदीर सोडले की काय | रामदास आठवले

News Desk

ठाणे महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात आंदोलन

News Desk

मालवानीत इमारतीचे छत कोसळले, दोन जण जखमी

News Desk