HW News Marathi
मुंबई

युवासेना केवळ बोलबच्चन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची टीका

मुंबई,स्टूडण्ट काऊन्सिलची निवडणूक पुढे ढकलल्यावरुन युवासेना अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रसने कडाडून टीका केली आहे. ठाकरेंचे विद्यार्थी चळवळीतील सहभाग केवळ बोलबच्चनपुरता असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड अमोल मातेले यांनी केला.

मुंबई विद्यापीठाच्या गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यातील निकालांत अभूतपूर्व गोंधळ दिसून आला. या काळात युवासेना वगळता प्रत्येक विद्यार्थी संघटना आपापल्यापरिने लढत होत्या. मात्र युवासेनेने विद्यार्थ्यांना या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी आपले योगदान फारच मर्यादित ठेवले. त्यामुळे स्टुडण्ट काऊन्सिलच्या निवडणूका पुढे ढकलल्याने ठाकरेंच्या तयतयाट पटणारा नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अॅड अमोल मातेले यांनी दिली.

निकाल मिळत नसल्याने विद्यार्थी रडकुंडीला आलेले असताना आदित्य ठाकरे झोपलेले होते का या शब्दांत मातेले यांनी ठाकरेंवर टीका केली. युवासेनेचा मुंबई विद्यापीठाच्या कामकाजात भरडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात फारसे योगदान नाही, एखाददुसरे थातुरमातुर आंदोलन वगळता सहा महिन्यांपासून युवासेना मुंबई विद्यापीठात कुठेच दिसून नाही आली. शिक्षणमंत्र्याचा राजीनामा मागितल्याखेरिज आदित्य ठाकरे कुठेच दिसून आली नाही. मुंबई विद्यापीठाच्या गोंधळात विद्यार्थी अक्षरश बेहाल झाले. निकाल लागला तरीही मार्कशीट नाही, तात्पुरते प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी परत मिळाली नाही, निकाल नसल्याने विद्यार्थ्यांना नोकरीही गमवावी लागली. या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. आजही मुंबई विदयापीठाने वेळापत्रकाचा गोंधळ मांडून लॉच्या विद्यार्थ्यांचा खेळ चालवला आङे. सामाजिक न्याय विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही, तरीही आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांची दया येत नाही.

मैदानात उतरता येत नाही म्हणून आदित्य ठाकरेंना ट्विटरचा आधार घ्यावा लागतो, अशी घणाघाती टीका अॅड मातेले यांनी केली. परंपरेच्या नावाखाली शिवसेने्च्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत आदित्य ठाकरेंना शिवसेनेने पहिल्या क्रमांकावरील शिवसेना नेते पद बहाल केले आहे. परंतु ज्या नेत्याला विद्यार्थी संघटना धड सांभाळता येत नाही तो नेतेपदावर केवळ परंपरेच्या नावाखालीच टिकणार, अशी टीकाही मातेले यांनी केली.

विद्यार्थ्यांचा घोळका हवा असेल तर प्रत्यक्षात कामही करावे लागते. आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या गोंधळात प्रत्यक्षात कुठेच सहभाग घेतला नाही. केवळ राज्यपाल भेटीने विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभागी होता येत नाही, त्यासाठी प्रत्यक्षात मैदानातही उतरावे लागते, असा टोलाही अॅड मातेले यांनी आदित्य ठाकरेंना मारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीला प्रियंका चोप्राने नोटीस बजावली

swarit

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी

News Desk