HW Marathi
मुंबई राजकारण

जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपल्या महापौरपदाचा राजीनामा द्या !

मुंबई | सांताक्रूझ येथील गोळीबार परिसरात रविवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी विजेच्या झटक्याने ५५ वर्षीय माला नागम आणि त्यांचा २६ वर्षीय मुलगा संकेत यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर येथील स्थानिक रहिवाशांमध्ये अत्यंत नाराजीचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या विभागाला भेट दिली. त्यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या दुर्घटनेविषयी जाब विचारणाऱ्या या संतप्त नागरिकांपैकी एक महिलेचा चक्क हात मुरगळत तिला दमदाटी केली. सांताक्रूझमध्ये झालेल्या या संपूर्ण प्रकारच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महापौर महाडेश्वर यांच्यावर निशाणा साधला आहे.

“तुम्हाला आदरणीय किंवा माननीय विशेषण लावता येणार नाही, कारण तुमचे वर्तन त्या पदाला शोभेल असे नाही. म्हणून महोदय असे लिहित आहे. जनाची नाही तर, मनाची लाज बाळगून महाडेश्वरांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा द्यावा”, अशी संतप्त मागणी शालिनी ठाकरे यांनी केली आहे. महाडेश्वर यांच्या या कृत्यानंतर मुंबई महिला काँग्रेसने देखील बुधवारी (७ ऑगस्ट) महाडेश्वर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अजंता यादव यांनी बुधवारी निर्मलनगर पोलिसांची भेट घेत याबाबत एक लेखी पत्र दिले आहे. विश्वनाथ महाडेश्वरांच्या इतक्या संतापजनक कृत्यानंतरही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. याबाबत देखील संताप व्यक्त करण्यात आला होता.

Related posts

लोकल ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना मृत्यू झाल्यास रेल्वेकडून नुकसान भरपाई

‘हे’ तात्पुरत्या स्वरूपाचे खातेवाटप !

News Desk

‘आप’ पंजाबमधील सर्व जागा लढविणार, केजरीवाल यांची माहिती

News Desk