HW News Marathi
मुंबई

रागाच्या भरात आईने तीनवर्षाच्या पोटच्या मुलाला फेकले

मुंबई | गोवंडीतील शिवाजीनगर विभागातील रफिक नगरमध्ये एका आईने रागाच्या भरात आपल्या पोटच्या ३ वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर आई फरार झाली असून शिवाजीनगर पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

तीन वर्षीय मुलीचे नाव चांदणी असे आहे. बुधवारी सायंकाळी मुलगी घरात मस्ती करत होती. यामुळे आई नादरा शेखने मुलीला जबर मारहाण केली. यामध्ये ही मुलगी गंभीर जखमी झाली. महिलेने तत्काळ मुलीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीच्या आईकडे मुलीबाबत विचारणा केली असता, गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिने येथील डॉक्टरांना सांगितले. या आजारावर केलेल्या उपचाराचे कागदपत्र डॉक्टरांनी मागितले असता घरी जाऊन घेऊन येते असे सांगून या महिलेने रुग्णालयातून पलायन केले. बराच वेळ महिला परत न आल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कळविले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार आरोग्य विभागाकडे पुरेशी संसाधने उपलब्ध

News Desk

शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा गुन्हा नोंदवा – आदित्य ठाकरे

News Desk

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोळीवाड्यात कच-याचे साम्राज्य

News Desk