HW News Marathi
मुंबई

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले 

मुंबई – भांडूप महापालिकेच्या पोटनिवडणूकीत मिळालेल्या विजयाचे औचित्य साधून भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पून्हा एकदा शिवसेनेला लक्ष केले आहेत. पोट निवडणूकीत मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपनं हा विषय मिळवला आहे अशा शब्दात शिवसेनेवर टिका केली आहे. त्यांनी आपले हे मत ट्विटर द्वारे व्यक्त केले.

ते एेवढ्यावरच थांबले नाहीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास असल्याचं मतंही त्यांनी व्यक्त केलं. हा विजय विकासाचाच असं सांगत सांगा आता वेडे कोण ठरले असा प्रश्नही त्यांनी टि्वीट द्वारे उपस्थित केला आहे. शेलार यांच्या या टिकेला आता शिवसेना कशा पद्धतीनं उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची नववर्ष स्वागत यात्रा

News Desk

महाराष्ट्र बंद मागे, दोषींवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

News Desk

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

News Desk