मुंबई | कोरोना’च्या या भयानक आणि जागतिक संकटाशी लढण्यासाठी सरकारने बंद पुकारला आहे, तसेच, २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जनता कर्फ्यूच्या या आवाहनास प्रतिसाद म्हणून रविवारी (२२ मार्च),मुंबई मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. मेट्रो प्रशासनाने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. मध्य रेल्वेनं रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला असून एकूण क्षमतेच्या ६० टक्के लोकल गाड्याच मुंबईत चालवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
In continuation of our fight against #Covid19 and in support of Hon’ble PM’s appeal of #JanataCurfew, #MumbaiMetroOne suspends operations on 22/03/2020 (Sunday) for the entire day, to encourage people to stay at home and make “Janta Curfew” an unprecedented success. #HaveANiceDay
— Mumbai Metro (@MumMetro) March 21, 2020
दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याकारणाने मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक असणार आहे. गावाकडील अनेक यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रमुख देवस्थानेही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२० मार्च) पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील काही मोठी शहरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यातून सार्वजनिक वाहतुक वगळण्यात आली आहे. परंतु सावधानी म्हणून मुंबई मेट्रोने स्वत:हून मेट्रोसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.