मुंबई | कोहिनूर मिल प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज (२२ ऑगस्ट) ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर मुंबई पोलिसांनी जमावबंदी (कलम १४४) लागू केली आहे. मरिन ड्राईव्ह, एमआरए मार्ग, दादर, आझाद मैदान पोलीस स्थानक भागात जमाव बंदीचा आदेश जारी केला आहे. तसेच ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. ईडी कार्यालयाजवळ बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
Mumbai Police: Section 144 of the Code of Criminal Procedure (CrPC) imposed in areas under Marine Drive, MRA Marg, Dadar, and Azad Maidan police stations. pic.twitter.com/DQWWzK2BgT
— ANI (@ANI) August 22, 2019
या भागात एक मार्गी वाहतूक ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.