मुंबई | मुंबईतील पवई परिसरातील हिरानंदानी येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (१ जुलै) घडली होती. सकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईतील पवई येथील हिरानंदानी परिसरात असलेल्या डेल्फी नावाच्या इमारतीला आज सकाळी ६.१५ वाजता आग लागली. या इमारतीत एका कार्यालयाला ही आग लागली. परंतु काही वेळातच आगीने रौद्ररूप घेतले. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
A fire broke out at Delphi Building in Powai at about 6:15 am. Fire confined to the 3,000 sq ft office area on 5th floor. 3 small engine lines of 5 fire motor pumps are in operation. No injuries reported: Mumbai Fire Brigade pic.twitter.com/E2ivOEsVRr
— ANI (@ANI) July 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.