HW News Marathi
मुंबई

अंधेरी पूल दुर्घटनेसाठी पालिका जबाबदार | मुंबई हायकोर्ट

मुंबई | मुंबईकरांच्या सुविधांशी संबंधित अपघातांसाठी महानगरपालिकाच जबाबदार राहणार असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच पालिकेने आपली जबाबदारी झटकू नये, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने पालिकेचे कान टोचले. तसेच प्रत्येक वेळी पालिका पूल पडण्याची वाट का पाहते, पालिकेने सर्व पुलांच याआधी ऑडिट का केले नाही. असा सवाल मुंबई हायकोर्टाने पालिकेला केला आहे. तसेच पालिकेचे नगरसेवक आणि वॉर्ड अधिकारी यांना कधीच जबाबदार का धरले जात नाही, असा थेट प्रश्न हायकोर्टाने करुन पालिकेला कोडीत पकडण्याच प्रयत्न केला आहे.

या दुर्घटनेनंतर गोखले पूल रेल्वे की पालिका कोणाच्या अंतर्गत येतो. यावरुन राजकारण पेटताना दिसले होते. गोखले पूल हा मुंबई महापालिके अंतर्गत येतो, असे प्रशासनाने पत्रकाद्वारे म्हटले आहे. तर गोखले पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.

अंधेरी पूल दुर्घटना

अंधेरी स्टेशन जवळील गोखले पुलाचा काहीसा भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पूल दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले होत. गोखले पूल हा जवळपास ६० वर्षे जुना असल्याचे बोलले जात आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनच्या ८ आणि ९ या प्लॅटफॉर्मवरील ही घटना आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महानगरपालिका २३ पुलांखाली उभी करणार उद्याने 

Gauri Tilekar

वांद्रे गरीबनगरमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट, भीषन आग, 22 गाडया घटनास्थळी, video

News Desk

टँकरधारकांनी मुंबईतील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा; मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Aprna
महाराष्ट्र

विघ्नहर्त्याला ही प्लास्टिक बंदीचे विघ्न

News Desk

मुंबई | राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक बंदीचा फटका आता गणेश कार्यशाळामध्ये बनत असलेल्या गणेश मूर्तींना बसत आहे. गणेश उत्सव अगदी काही दिवसावर येवून ठेपला आहे. याच कालावधीत शासनाने प्लास्टिक बंदी घातल्याने याचा परिणाम गणेश मूर्ती घडविणाऱ्या कार्यशाळावर झाला आहे. गणेश मूर्ती झाल्यावर पावसाने भिजू नये म्हणून व खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकने झाकली जाते. मात्र आता प्लास्टिक बंदी झाल्याने या गणेश मुर्त्या झाकायच्या कशा, ह्या विचारात गणेश मूर्तीकारांना पाडले आहेत.

शहरात शाडू मातीपासून मूर्ती बनविणाऱ्या अनेक कार्यशाळा आहेत. बाप्पाच्या काही मुर्त्या विदेशात देखील जात असल्याने या मूर्त्यांना प्लास्टीकचे आवरण घातले जाते. परिसरातील धूळ बसल्याने मुर्त्या खराब होत असल्याने प्लास्टिक घालून या मुर्त्यांचे रक्षण केले जाते. मात्र आता प्लास्टिक बंदी असल्याने कारवाई होण्याच्या भीतीने मुर्त्या न झाकता ठेवल्या असल्याने धुवाधार पावसात या मुर्त्यांवर परिणाम होत आहे. प्लास्टिकला अन्य पर्याय नसल्याने ह्या मुर्त्या जपण्यासाठी मूर्तीकारांना धडपड करावी लागत आहे. मुर्त्यांची बनावट नाजूक असल्याने या मुर्त्यांची पुन्हा सफाई करताना हानी पोहोचत आहे.

मूर्तीकारांना प्रथमच अशा वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी शाडू मातीच्या किचकट मूर्तीचा प्रसार करणाऱ्या मुर्तीकाराना आता समस्येने ग्रासले असल्याने प्लास्टिक ऐवजी अन्य पर्याय मूर्तिकार शोधत आहे.

गेल्या ५५ वर्षापासून मुर्ती घडविणाऱ्या मुर्तीकार पांडुरंग राजाराम कदम यांच्याशी प्लास्टिक बंदीवर संवाद साधताना ते म्हटले की, पालिकेने प्लास्टिक बंदी करणे हा सरकारचा एक उत्तम निर्णय आहे. या निर्णयाचा आम्ही देखील स्वागत करत आहोत. परंतु प्लास्टिक बंदीचा सर्वात जास्त त्रास हा शाडूच्या मुर्तींना होतो. शाडूच्या मुर्तींना कलर आणि धूळ चिकटून राहते. त्यापासून रक्षण करण्यासाठी आम्ही मुर्तीकार प्लास्टिकच्या आवरणाने बाप्पाच्या मुर्ती झाकून ठेवतो. मात्र प्लास्टिकचे आवरणात मुर्ती नाही झाकले तर या मुर्तींवर ब्रश मारला तर ब्रशबरोबर कलर देखील निघतो. त्यामुळे यंदा मुर्तीकारांना त्याच्या बाप्पाच्या मुर्ती घडविण्यापेक्षा त्यांचे पावसापासून कशी सुरक्षा करावी याच चिंता आहे.

Related posts

मुख्यमंत्र्यांची ‘मी जबाबदार’ घोषणा पण वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण?- सुधीर मुनगंटीवार

News Desk

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्यच- शरद पवार

News Desk

माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा – उद्धव ठाकरे

News Desk