HW News Marathi
मुंबई

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील तीन दिवस उपचार घेणार

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते ब्रीच कॅन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल झाले आहे. शरद पवार हे डॉक्टरांच्या सल्लानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून प्रसिद्ध पत्रक काढून माहिती दिली आहे. पुढील तीन दिवस शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेणार आहेत. परंतु, शरद पवार रुग्णालयात दाखल होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, शरद पवार यांना 2 नोव्हेंबरला डिस्जार्च मिळेल. यानंतर लगेच शरद पवार हे 3 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे जाणार असून 4 व 5 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय शिबिरात उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पद्मावत सिनेमाला मनसेकडून पाठिंबा असल्याची अफवा

News Desk

भारतात प्रथमच दहा शहरांत ई-स्पोर्ट स्पर्धा होणार

swarit

आयएनएस करंजचं जलावतरण

swarit