HW Marathi
Covid-19 मुंबई

मुंबईत इतर शहरांप्रमाणे पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही – किशोरी पेडणेकर

मुंबई | राज्यात सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळले होते. मात्र, हळूहळू मुंबईत रुग्णांची संख्या मुंबईत कमी झाली आणि आता मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आली आहे अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच मुंबईच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत रुग्णसंख्या दुपटीचा दर हा ५० दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर डिस्चार्ज रेटही ७० टक्के झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

कोरोनाबाबत मुंबईतील परिस्थिती इतर शहरांच्या तुलनेत पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे पुणे किंवा ठाणे पुन्हा लॉकडाऊन करावे लागले, तशी गरज मुंबईला नाही,” असे महापौर म्हणाल्या. मात्र ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळतील, त्या ठिकाणी आठवडाभरासाठी लॉकडाऊन करत आहोत. मात्र पूर्ण मुंबई लॉकडाऊन नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत इतर जिल्ह्यांप्रमाणे कोरोनाची स्थिती नाही, मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे १०० टक्के लॉकडाऊनची गरज नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील दिली.

“जर पुन्हा मुंबईत लॉकडाऊन होऊ नये, असं वाटत असेल तर सर्वांनी सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर केला पाहिजे. सतत सॅनिटायझर वापरले पाहिजे. कोणतीही लक्षणे असली, ताप असेल तर डॉक्टरकडे जा,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

या आधी ज्या टेस्टिंग केल्या जात होत्या त्या २ ते ४ हजारापर्यंत जात होत्या. तेव्हा कोरोना रुग्णांची संख्या ही हजार ते दीड हजारपर्यंत होती. मात्र, आता जवळपास सात ते आठ हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या आपल्याकडे २५० व्हेटिंलेटर आहेत. सात हजार बेड आहेत.” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“मुंबईत हाय सोसायटीत कोरोना रुग्ण आढळत आहे. अनुपम खेर, अमिताभ बच्चन रेखा यासारख्या सेलिब्रिटीपर्यंत कोरोना पोहोचला आहे. मिशन बिगीन अगेनमुळे शुटींग वैगरे सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी शुटींग आहेत, त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग, मास्क वापर होतो का, यावरही वॉर्ड ऑफिसरला लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.

“सध्या झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र हाय सोसायटीमध्ये कोरोना वाढू लागला आहे. याचा अर्थ अनेक लोकं घराबाहेर पडली आहे. त्यामुळे संसर्ग वाढला आहे. झोपडपट्टीत 4T हे तंत्र वापरले होते. त्यानुसार आता हाय सोसायटीनेही हे तंत्र वापरण्यास परवानगी द्यावी किंवा त्यांनी स्वत: करावे, असेही त्या म्हणाल्या.

Related posts

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली

News Desk

एलबीएस मार्गावरील उघडे मॅनहोल मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता !

News Desk

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६% लागला, तर यावर्षी देखील मुलींनी मारली बाजी !

News Desk