HW News Marathi
मुंबई

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबई | छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ असे होणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी ट्विटद्वारे दिली आहे. “गेल्या बऱ्याच वर्षांपासून केली जाणारी मागणी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो”, असे त्यांनी म्हटले आहे.

जनतेकडून अनेक वर्षांपासून वारंवार होणाऱ्या या मागणीची पूर्तता झाली असून विमानतळाच्या नावात अखेर सुधारणा करण्यात आली आहे. विमानतळाच्या नावात बदल होऊन महाराज ही उपाधी लागणे ह्यात शिवसेनेचे श्रेय असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या नेतृवाखाली शिवसैनिकांनी व महिला आघाडीने महिन्याभरापासून सांताक्रुझ येथील आंतरदेशीय विमानतळावर आंदोलन केले होते.

वाचा काय आहे प्रकरण

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ’ असे केले नाही तर, विमानतळ बंद करू, असा इशारा ऑगस्ट दरम्यान शिवसेनेने दिला होता. शिवाजी महाराजांच्या नावापुढे ‘महाराज’ न लावणे हा त्यांचा अपमान आहे, अशी भावना शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव दयावे या मागणीसाठी शिवसेना आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला होता. तसेच, ज्या कंपनीला विमानतळाचे कंत्राट देण्यात आलेले आहे त्यांना महाराजांबद्दल आदर नाही, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदिवलीत जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

News Desk

गुढीवाडव्याच्या मुर्हूतावर राज्यभरात प्लास्टिक बंदी

News Desk

मुंबईतल्या काळी-पिवळी टॅक्सीचंही अँप येणार

News Desk