HW News Marathi
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या नामांतराचा वाद

मुंबई | सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद ताजा असतानाच आता मुंबई विद्यापीठाचं नाव राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ करा, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत सादर केला आहे.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाला शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अन्य काहींनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. त्यावर कोणताही निर्णय झालेला नसताना राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. त्यानंतर हा वाद हायकोर्टात गेल्यानंतर नामांतर लांबणीवर पडलं आहे.

नावे बदलेली विद्यापीठ

१) मराठवाडा विद्यापीठ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

२) पुणे विद्यापीठ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

Related posts

नेदरलँडची राणी मॅक्झिमाने घेतली डबेवाल्यांची सदिच्छा भेट

News Desk

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

News Desk