HW News Marathi
मुंबई

नेदरलँडची राणी मॅक्झिमाने घेतली डबेवाल्यांची सदिच्छा भेट

मुंबई | नेदरलँडची राणी मॅक्झिमा यांनी आज मुंबईच्या डबेवाल्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. राणी सोमवारी पंतप्रधान नरेंद्रमोदी यांची भेट घेतल्यानंतर डबेवाल्यांना भेटण्यांची इच्छा व्यक्त केली होती. ही भेट अंधेरी स्टेशनजवळ झाली. मॅक्झिमा यांनी डबेवाल्यांची फक्त भेट न घेता या डबेवाल्यांनसोबत गप्पा देखील मारल्या.

राणीच्या भेटीमुळे डबेवाल्यांमध्ये उत्साहचे वातावरण पहायला मिळाले. डबेवाल्यांनी राणी मॅक्झिम यांना डबेवाल्यांची डब्यांची प्रतिकृती भेट म्हणून दिली. या भेटीने राणी आनंदी झाली असून त्यांनी डबेवाल्यांच्या खरा डब हातात घेऊन डबेवाल्यांसोबत फोटो काढला. संपूर्ण जगातील लोकांच्या भुवया उंचवातील अशी आपल्या मुंबईच्या डबेवाल्यांची डब्बे पोहचवण्यांचे कौशल्य कसे अवगत केले.

या गोष्टीचा शोध अजूनपर्यंत तर कोणालाच लागला नाही. या डबेवाल्यामुळे मुंबईकर निवांत ऑफिसमधून बसून घरचे भोजन ग्रहण करतात. हे डबेवाले ज्या पद्धतीने एकाकडून दुसरीकडे आणि दुसरीकडून तिसरीकडे अशा पद्धतीने डबेवाले मुंबईकरांचे डब्बे पोहचवतात. डबेवाल्यांच्या कलेचे आश्चर्य वाटण्यांची गोष्ट म्हणजे डबेवाल्यामधील बहुतांश डबेवाले निरक्षर असल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

swarit

जेएनयूतील घोषणाबाजीच्या वादावेळी मी तिथे नव्हतोच | कन्हैय्या कुमार

News Desk

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

News Desk