मुंबई | ज्याप्रमाणे एखाद्या मोबाईल कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधेशी संतुष्ट नसल्यास आपण दुसऱ्या कंपनीचे सिमकार्ड वापरतो. त्याचप्रमाणे आता सेट टॉप बॉक्सचे कार्ड देखील बदलता येणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लवकरच एका नव्या प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. जर तुम्ही तुमच्या केबल नेटवर्क ऑपरेटरकडून देण्यात येणाऱ्या सुविधेशी संतुष्ट नसाल तर तुम्ही सेट-टॉप बॉक्समधील कार्ड बदलून दुसऱ्या कंपनीचे कार्ड वापरु शकता.
अनेकदा केबल ऑपरेटरच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त असतात. त्यामुळे या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान डीटीएच कंपन्या आणि केबल ऑपरेटर्सनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे. सेट टॉप बॉक्सचे कार्ड बदलल्यास पायरसीसह अन्य तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता या कंपन्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.