मुंबई । गेल्या १२ दिवसांपासून ओला-उबरचा सुरू असलेला संप अखेर चालकांनी मागे घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर ओला-उबर चालकांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. ओला-उबर व्यवस्थापनाकडून असमाधानकारक व्यवसाय मिळत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू होता.
Drivers' associations of OLA & UBER withdraw strike after a meeting with Maharashtra Transport minister Diwakar Raote today. The drivers who were on a strike since October 22 are demanding increased earnings & better work schedule
— ANI (@ANI) November 2, 2018
२२ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ओला-उबर व्यवस्थापन आणि संघाचे प्रतिनिधी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. यामध्ये ओला-उबर व्यवस्थापनाने चालकांना प्रति किलोमीटर दरवाढीसह सुमारे ८० टक्के मागण्या मान्य केल्या होत्या. यात कमिशन वजा न करता प्रति किलोमीटरमागील दरात वाढ करण्यात आली होती. शिवाय नव्याने लीज कॅब भाडेतत्त्वावर घेण्यात येणार नाही, रायडिंग टाइमसाठी प्रति किलोमीटर दीड रुपये देणे या आणि अशा अन्य मागण्या ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य केल्या. मात्र याबद्दल लेखी आश्वासन मिळत नसल्यामुळे अॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
या संपात सुमारे ५० हजार अॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालक सहभागी झाले होते. या प्रकरणी सरकारने दोन दिवसात तोगडा न काढल्यास ५ नोव्हेंबरला लालबाग ते मंत्रालय पायी धडक मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा संघाने २ नोव्हेंबरला दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.