मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परेलच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात सालाबादाप्रमाणे यंदाही मंगळवारी सकाळी विद्यार्थी शिक्षकांच्या उपस्थितीत ध्वजरोहन झाले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांच्या निशा कुमार यांच्या हस्ते ध्वज रोहन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक सुभाष मोरे यांनी विद्यार्थांसमोर भाषण करत स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा दिला. त्याच बरोबर महाविद्यालयाची विदयार्थीनी अनुजा मनगुटकर हीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला एनसीसी विभागाचे प्रमुख व्ही. एन. मिश्रा, गणित विभागाच्या प्रमुख शारदा विभावे, इंग्लिश विभाग प्रमुख प्राध्यापक खुराडे., प्रा. डॉ. आव्हाड, प्राध्यापक माने, क्रिडा विभाग प्रमुख मनोज पाटील, इतिहासाचे प्राध्यापक सुशांत भोसले यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी हुतात्मांच्या मुलांची व त्यांच्या कुटुंबाची व्यथा एक पात्री नाटकाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या शंतनु अडसुळ, तेजस धापटे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर मांडली. तसेच यावेळी धीरज पारकर या विद्यार्थ्यांने अण्णाभाऊ साठे लिखीत माझी मैना गावाकडे राहीली आणि जय जय महाराष्ट्र माझा ही गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मराठी विभागाचे प्राध्यापक राजरतन जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय प्रभु यांनी केले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. टी.पी. घुले यांच्या सहकार्याने पार पडला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.