HW News Marathi
मुंबई

तिसऱ्या दिवशीही जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन सुरु

मुंबई | जे जे रुग्णालयात शनिवारी दोन डॉक्टरांना मारहाण झाल्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनाला सुरुवात केली आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सोमवारी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून या मारहाण प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत डॉक्टरांची याबाबत आज बैठक होणार आहे.

शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ११ मध्ये दोन निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण कोली होती. हा वॉर्ड सर्जरी वॉर्ड आहे. या मारहाणी दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. संबंधीत घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेचा मुंबईमधील सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील एक दिवसीय संप पुकारत निषेध व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

22 वर्षीय मुलीला आईनेच ढकलेल वेश्याव्यवसायात

News Desk

के.ई.एम. रुग्णालयात हृदयविकार पुनर्जीवन प्रात्‍याक्षिक संपन्‍न

swarit