HW News Marathi
मुंबई

पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअरच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदत

मुंबई | पनवेल विभागीय ग्रामीण डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने केरळ येथे आलेल्या महापुरात पूरग्रस्त नागरिकांना औषधे संकलित करून पाठविण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोशीन अत्तार यांनी सर्व डॉक्टर आणि एम. आर यांना आपल्याकडील औषध संकलित करण्याचे आवाहन केले.

या आवाहानातून डॉक्टरांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली तसेच एम. आर आणि औषध कंपन्यांचे डिस्ट्रीब्यूटर्स, मालक यांनी स्वतःकडील जास्तीत जास्त औषध संकलित करून डॉक्टरांनी त्यांचे वर्गीकरण केले. ही औषध ‘श्री अयप्पा सेवा संगम पनवेल’ यांना सुपूर्त करण्यात आली. ही औषधे तातडीने केरळ येथील पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले. ही औषध बाजारातील दराप्रमाणे सात ते आठ लाख रुपये इतक्या किंमतीची असल्याचे डॉ. मोशीन यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | आरोपींची पोलीस कोठडी देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

News Desk

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग, ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

swarit

सीएसटी कर्जत लोकलमध्ये गरोदर महिलेला मारहाण

News Desk