HW News Marathi
मुंबई

Parel Fire | चिमुरडीने वाचवले कुटुंबियांचे प्राण

मुंबई | परेलमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. आगीच्या धुराने लिफ्टमध्ये गुदमरून दोन जणांना तर आगीत होरपळून दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून अनेकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले असून काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत प्रसंगावधान बाळगत एका १० वर्षाच्या चिमुरडीने(झेन) आपल्या कुटुंबियांना सुरक्षितपणे आगीबाहेर पडण्याचे तंत्र दाखवत त्यांचे प्राण वाचवले.

‘झेनने घाबरून न जाता हाताला लागतील ते सर्व कपडे आई-बाबांना पाण्यात भिजवायला सांगितले. ते ओले कपडे कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना श्वासोच्छ्वावासासाठी नाकाजवळ धरण्यास सांगितले. या ओल्या कपड्यात कार्बन शोषला जाऊन ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्यामुळे तो कपडा नाकाजवळ धरला कि आगीच्या धुरामुळे श्वसनासाठी होणार त्रास कमी होतो. या शाळेत शिकलेल्या गोष्टी झेनने खऱ्या आयुष्यात वापरत अनेकांचे प्राण वाचवले.

इमारतीला आग लागल्याचे कळताच संपूर्ण कुटुंब घाबरले असताना झेनने मात्र आगीतून बाहेर पडण्याचं शास्त्रशुद्ध तंत्र वापरून कुटुंबासह इमारतीतील इतर रहिवाश्यांचे जीव वाचवले. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

संबंधित बातम्या

परेल येथील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चार जणांचा मृत्यू

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचे निधन

News Desk

नीरव मोदीला प्रियंका चोप्राने नोटीस बजावली

swarit

मुंबईतील तीन डान्स बारचे परवाने रद्द, पोलिस उपायु्क्त सचिन पाटील

News Desk