HW News Marathi
मुंबई

परेल येथील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चार जणांचा मृत्यू

मुंबई | परेल येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला आज सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. ही इमारत सध्या असुरक्षित म्हणून घोषित केली असून, इमारतीचा विद्युत आणि पाणीपुरवठा थांबवला असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यानी दिली आहे.

या इमारतीत अडकलेल्या रहिवास्यांना क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून त्यापैकी ८ जणांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तविली जात आहे. या आगीत इमारतीच्या वरच्या काही मजल्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अबब ! अर्शद वारसीच्या वीज बिलाची इतकी किंमत?

News Desk

साध्या वेषात मोहीम फत्ते !

News Desk

शिवसैनिकांसाठी वाघाची अंगठी

swarit
देश / विदेश

केंद्र सरकारने नाकारली केरळसाठी यूएईची मदत

Gauri Tilekar

नवी दिल्ली | केरळमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ४०० हुन अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत, १४ लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत तर हजारो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या केरळ राज्याला यूएई (युनायटेड अरब अमिरातने) देऊ केलेली ७०० कोटींची मदत केंद्र सरकारने नाकारली आहे. देशातील संकटांना आपण स्वबळावर सक्षमपणे तोंड देणार असल्याचे सांगत, केंद्र सरकारने यूएईच्या मदतीला नकार दिला आहे.

यूएईमध्ये कामाच्यानिमित्ताने वास्तव्यास असणाऱ्या एकूण भारतीयांपैकी ८०% भारतीय हे फक्त केरळ राज्यातील आहेत. यूएईच्या प्रगतीत केरळी लोकांचे मोठा वाट आहे. ही बाब लक्षात घेता यूएईने केरळ राज्याला ७०० कोटींची मदत देऊ केली होती. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीच याबाबत माहिती दिली होती. केरळ पूरग्रस्तांसाठी देश-विदेशातून त्याचप्रमाणे देशातील अनेक राज्यांतून मदतीचा ओघ सुरु आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळला २० कोटींची मदत याआधीच जाहीर केली. तसेच मुंबई-पुण्यातील एकूण ८१ डॉक्टरांची टीमदेखील सोमवारी केरळला रवाना झाली आहे. त्याचप्रमाणे दिल्ली सरकारने १० कोटी तर तेलंगणाने २५ कोटी, आंध्रप्रदेश १० कोटी, पंजाब १० कोटींची जाहीर केलेली मदत तातडीने केरळ पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. केरळमधील पूरपरिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असून केंद्राकडे २६०० कोटींचे विशेष पॅकेज मागण्याचा निर्णय केरळचे मुखमंत्री पिनराई यांच्या अध्यक्षतेखाली घेतला गेला आहे.

संबंधित बातम्या

केरळच्या मदतीसाठी यूएईचा हात

केरळमधील महापुरात आतापर्यंत ३८५ जणांचा मृत्यू

Related posts

देशात पहिल्यांदाच महिला गुन्हेगाराला फाशी होणार!

News Desk

नव्या वर्षात गृहिणींना दिलासा, सिलेंडर १२० रुपयांनी स्वस्त

News Desk

जैश-ए-मोहम्मद कडून स्टील बुलेटचा वापर

News Desk