HW News Marathi
मुंबई

कल्याणमध्ये कुत्र्यांवर पोलिसांचा ताबा

मुंबई | कल्याण पश्चिम येथील गोदरेज हिल या उच्चभ्रू परिसरात एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. परदेशी जातीच्या तब्बल 9 कुत्र्यांना अत्यंत दयनीय अवस्थेत डांबून ठेवणाऱ्या डॉक्टरवर खडकपाडा पोलिसांनी प्राणी क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कल्याणमधील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गोदरेज हिल परिसरात डॉक्टर विरेंद्रपाल सिंग यांचा प्रशस्त बंगला आहे. या बंगल्यात अनेक कुत्र्यांना अत्यंत क्रूरतेने डांबून ठेवल्याची माहिती वाशीतील एनजीओचे कार्यकर्ते चेतन रामानंद शर्मा यांना मिळाली होती.

चेतन शर्मा यांनी याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत या बंगल्यात जाऊन पाहणी केली. त्यावेळी समोरचे दृश्य पाहून सर्वानाच धक्का बसला. अत्यंत देखणे आणि सर्वात महागडे समजले जाणारे परदेशी जातीचे (फॉरेन ब्रीड) 9 कुत्रे अत्यंत मरणासन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. गेल्या कित्येक दिवसांपासून या कुत्र्यांना अत्यंत अपुऱ्या जागेत आणि अन्नविना ठेवण्यात आल्याचे त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तर काही कुत्रे भुकेपोटी आपलीच विष्ठा खात असल्याचे आढळून आल्याची माहिती चेतन शर्मा यांनी दिली

या सर्व कुत्र्यांची बंगल्यातून सुटका करून त्यांना काही वेळ खडकपाडा पोलीस ठाण्याबाहेर बांधण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर तातडीने औषधोपचार आवश्यक असल्याने या सर्वांना चेतन शर्मा यांच्या तुर्भे येथील केंद्रात हलवण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या या कुत्र्यांमध्ये 3 सायबेरीयन हस्की,1 डोंगो अर्जेंटिनो, 1 सेंट बर्नार्ड, 3 गोल्डन रेटव्हीवर,1 फ्रेंच मॅस्टीफ अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. या एका कुत्र्याच्या पिल्लाची किंमतच सुमारे 70 हजारांच्या घरात असल्याची माहिती प्राणीमित्राने दिली. विरेंद्रपाल सिंग हा या कुत्र्यांचे ब्रीडिंग करून त्यातून लाखो रुपये कमवत असल्याची शक्यता प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नेहरूनगर येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी! – मंगलप्रभात लोढा

Aprna

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

News Desk

विमानातून पडली एअर हॉस्टेस

swarit
राजकारण

मल्लिकार्जुन खर्गेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती

News Desk

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी खर्गेकडे सोपविण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी जे. डी. सिलम आणि महेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहसचिवपदाची जबाबदारी शशिकांत शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, ओडिशा आणि मिझोरमसाठी स्क्रिनिंग कमिटीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि मिझोरमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. तर ओडिशामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होईल.

Related posts

एकाकी लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

News Desk

आमच्याकडे सर्वच जण पंतप्रधान असतील !

News Desk

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला

Darrell Miranda