HW News Marathi
मुंबई

पोलिसवाल्याच्या पत्नीने टाकला 2 कोटीचा दरोडा

नवी मुंबईत काही दिवसापुर्वी कुरियर सर्विसचा बहाना करून एका व्यापा-याच्या घरात दरोडा टाकून 2 कोटी 9 लाख रूपये लुटले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका पोलिस कर्मचा-याच्या पत्नीसह 7 जणांना अटक केले असून ३ जण फरार आहेत. तपास दरोड्यामागे एका पोलिसाच्या पत्नीचा हात असल्याने. पोलिसही आश्चर्यचकित झाले आहे.

27 ऑक्टोंबर रोजी वाशी एफएमएसी मार्केटमधील हे सेक्टर १७ मधील कुसुम सोसायटीत अरूण मेनकुदळे यांच्या घरात दरोडा पडला होता. सकाळी ११ च्या सुमारास एक महिला आणि एक तरूण कुरियर देण्याच्या बहाण्याने आले, व्यापा-याच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडताच

महिला आणि तिचा साथीदार घरात घुसले. त्याचवेळी एक महिला जिन्यात उभी राहून बाहेर लक्ष ठेवत होती. आत घुसल्यावर दरोडेखोरांनी अरुण मेनकुदळे यांच्या पत्नीला रिव्हॉल्वरच्या जोरावर गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर दोघींना एका खोलीत बंद करण्यात आले. त्यानंतर घरातील तिजोरीत ठेवण्यात आलेली रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने अशी एकूण 2 कोटी 9 लाखाची रक्कम लुटून पसार झाले.

याप्रकरणी व्यापा-याने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सोसायटीच्या सीसीटिव्ही चेक केले त्या सीसीटिव्हीत धक्कादायक माहिती समोर आली. फ्लॅटच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात 7 दरोडेखोर कैद झाले आहेत. यात 2 महिलांचा समावेश आहे. जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा कळाले की यात एका पोलिसवाल्याच्या पत्नीचाही समावेश आहे. तिचे नाव अनित म्हसाने असल्याचे समोर आले. तिला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केले असता या दरोडा टाकण्याचा कट तीनेच रचला आहे. अशी कबुली दिली आहे. यापुर्वीही तिने अनेक गुन्हे केली आहे. याचीही उखल झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील पवई परिसरातील इमारतीला लागलेली आग आटोक्यात

News Desk

मालाडमध्ये भीषण आग

News Desk

आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

News Desk