HW News Marathi
मुंबई

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर  टिका करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टिका केल्यामुळे जुहु पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अनिकेत पाटील याला अटक केली असून दुस-याचा शोध पोलिस यंत्रणा घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

फेसबुक, ट्विटर च्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अश्लील टिका काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे.

या दोघांवर अश्‍लील शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केल्या प्रकरणी आणि माहिती व तंत्रज्ञान कायदयाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर लवकरच दुस-या आरोपीला देखील अटक करण्यात येईल अशी माहिती जुहु पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

News Desk

सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्राचीन बाहुल्यांचे प्रदर्शन संपन्न

News Desk

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

News Desk