HW News Marathi
मुंबई

पानपट्यावर चॉकलेट, वेफर्स आणि बिस्किट विकण्यास बंदी

मुंबई | शालेय विद्यार्थी चॉकलेट, वेफर्स आणि बिस्किट हे पदार्थ विकत घेण्यासाठी दुकानात जातात. त्यामुळे या वस्तू विकणाऱ्या दुकानांवर तंबाखू आणि तंबाखूजन्य दुकानावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बदल विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकाता असल्यामुळे हे पदार्थ घेतात, हे पदार्थ खाल्यानंतर यांचे व्यसन लागते.

या ठिकाणी सहजपणे गोळ्या, चॉकलेट, वेफर्स, कॉफी, शीतपेय आणि बिस्किट यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. गेल्या वर्षी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा परवाना दिलेल्या दुकानांना खाद्यपदार्थाची विक्री करण्यास बंदी असल्याचे जाहीर केले होते. पण, हा निर्णय बंधनकारक नसल्यामुळे यांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे सोपवले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषीमंत्र्यांना भेटू द्या, अन्यथा सातव्या मजल्यावरून उडी मारेन video

News Desk

रेल्वेला फेरीवाल्यांकडून दोन हजार कोटींचा हप्ता

News Desk

ड्रोणद्वारे दुष्काळाची पाहणी

News Desk