HW News Marathi
मुंबई

रिपब्लिकन पक्षाचा ६१ वा वर्धापनदिन सोहळा

मुंबई | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा ६१ वा वर्धापन दिन सोहळा येत्या ३ ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्यने उपस्थिती राहून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकारांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष उभरण्याचा संकल्प करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापन करण्यात आला. तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरुद्ध देशातील प्रबळ व्यापक विरोधी पक्ष म्हणून सर्व समावेशक रिपब्लिकन पक्ष उभारण्याची महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. त्यानुसार सर्व जाती धर्मीयांचा पक्ष म्हणून सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारण्याचा आमचा प्रयत्न असून त्यामुळेच दरवर्षी आपण रिपब्लिकन पक्षाचा स्थपना दिवस आपण साजरा करतो.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार कपिल पाटील, खा.राजन विचारे, आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, आ. प्रताप सरनाईक, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रामभाऊ तायडे असतील, अशी माहिती रिपाइं तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पादचारी पूल हटविताना क्रेन उलटली

News Desk

एअर इंडियामध्ये 225 कोटींचा सॉफ्टवेअर घोटाळा ?

News Desk

ताडदेव आरटीओ कँटीनमध्ये आग 

swarit
मुंबई

धोबी तलाव मधील एस एस गायकवाड रोड प्रकाशझोत

swarit

मुंबई | गेली अनेक वर्षे एस एस गायकवाड रोड वर बेस्ट पोलवर साधे दिवे लावले होती. त्यामुळे खूपच प्रकाश कमी पडत होता. यामुळे स्थानिक रहिवाशी यांना खूप नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. येथे गेले ४ दिवस लाईट नव्हती म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी तक्रार स्थानिक भाजप नगरसेविका रिटा मकवाना यांना दिली असता त्यांनी तात्काळ पाहणी करत त्वरित बेस्ट कर्मचारी यांना बोलवून त्वरित येस येस रोड वर एल ई डी लाईट बसवून घेतल्या आहेत.

गेली अनेक वर्षे आम्ही जुन्या लाईट दिव्यांच्या प्रकाशात होतो. पण या नगरसेविकाने धोबी तलावमध्ये खूप कामे केली आहेत. कोणही तक्रार केली असता त्वरित त्या स्थळी भेट देऊन त्या कामाचे निरसन करतात. धोबी तलाव रहिवाशी यांच्या सदैव पाठीशी असतात,असा विश्वास नागरिकांनी दर्शवला आहे. एस एस गायकवाड रोड वर एल ई डी वीज लावून घेतल्याबद्दल नागरिकांना रिटा मकवाना यांचे आभार मानले.

मी “सी वॉर्ड” ची प्रतिनिधी आहे सदैव त्यांच्या पाठीशी असणे मी माझे कर्तव्य समजते. कोणतेही काम असुदे ते प्रामाणिक करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि सदैव मी करत राहणार.एल इ डी लावून दिल्यामुळे नागरिकांनी माझे आभार मानले. अशी प्रतिक्रिया स्थानिक भाजप नगरसेविका रिटा मकवाना यांनी दिली.

Related posts

सीएसटी जीआरपी पोलिसांकडून चालत्या रेल्वेत पर्स ओढणाऱ्या आरोपीला अटक

swarit

मुळा नदीचे पाणी झोपडपट्टीत शिरले; नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

News Desk

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन

Adil