HW News Marathi
मुंबई

शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्सने पार केला ४० हजारांचा टप्पा

मुंबई | शेअर बाजाराने आज (३० ऑक्टोबर) ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने ४० हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबई शेअर बाजारात आज सकाळी १०.३० पर्यंत १८७.८४ अंक म्हणजे ०.४७ टक्के वाढून ४०, ०१९.६८ स्तरापर्यंत पोहोचला आहे. तर बाजरात निफ्टी ५५.३० अंक म्हणजे ०.४७ टक्के वाढीनंतर ११८४२.१५ येऊन पोहचला आहे. शेअर बाजार सकाळी ३९,९६९.६८ स्तरावरच उघडला होता. त्यानंतर सेन्सेक्समध्ये १३७.८४ अंकांची म्हणजेच ०.३५ टक्के वाढ होऊन ४० हजार पार गेला आहे. तर निफ्टीमध्येही ५९ अंक म्हणजेच ०.५० टक्के वाढील्यानंतर ११८४५.८५ स्तरावर उघडला.

भारती एअरटेल, ग्रासीम, आयओसी, इन्फोसिस, इन्फ्राटेल, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, येस बँक आणि विप्रोच्या शेअर्सने उसळी घेतली होती, तर टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, बीपीसीएल, पॉवर ग्रीड, सिप्ला, रिलायन्स, एम अँड एम आणि एनटीपीसीच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली आहे.दिवाळीनिमित्त रविवारी संध्याकाळी शेअर बाजारात विशेष मुहूर्त ठेवण्यात आला होता. तासाभराच्या या मुहूर्तादरम्यान सेन्सेक्समध्ये सुमारे २०० अंकांनी वाढ झाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळाघोडा फेस्टिव्हला मुंबई हायकोर्टाचा दणका

swarit

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

News Desk

सैफी बुऱ्हानी ट्रस्टचा गृहनिर्माण प्रकल्प नागरी पुनरुत्थान घडविणारा! – देवेंद्र फडणवीस

Aprna