मुंबई | कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांनी पैशांच्या स्वरुपाने, धान्याच्या स्वरुपाने तर कोणी वैद्यकीय सोयी पुरवण्याच्या मार्गाने सरकारला आणि कोरोनाबाधितांना मदत केली आहे. या सगळ्यांच्या यादीत बॉलिवूडा किंग खान शाहरुख खान यानेही मदत केली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी उपकरणे ठेवण्यास त्याने त्याचे वांद्रे येथील ४ मजल्यांचे कार्यालय मुंबई महानगरपालिकेला दिले आहे. महापालिकेने ट्विट करत शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हीचे आभार मानले आहेत.
We thank @iamsrk & @gaurikhan for offering their 4-storey personal office space to help expand our Quarantine capacity equipped with essentials for quarantined children, women & elderly.
Indeed a thoughtful & timely gesture!#AnythingForMumbai#NaToCorona https://t.co/4p9el14CvF
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 4, 2020
राज्यात आणि मुख्यत मुंबईत कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात गेत त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठीही जागा महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेला मदत म्हणून त्याचे त्याचे कार्यालय पालिकेच्या हवाले केले आहे. या कार्यालयात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना लागमारी क्वॉरंटाईनची उपकरणे ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, शाहरुख खान, गौरी खान, जुही चावला आणि जय मेहता यांच्या कोलकाता नाइट रायडर्स या आयपीएल टीमच्या माध्यमातून पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्यात येणार आहे. तसेच शाहरुख खान, गौरी खान यांच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्टकडून महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यात येणार आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स आणि मीर फाउण्डेशन मिळून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० हजार पीपीई किट उपलब्ध करून देणार आहे. मीर फाउंडेशन आणि द अर्थ फाउंडेशनकडून मुंबईतील ५ हजार ५०० कुटुंबियांना एक महिन्याचं जेवण देण्यात येणार आहे. त्याशिवाय दररोज सुमारे दोन हजार लोक जेवू शकतील, असे किचनही तयार करण्यात येणार असल्याची माहिती शाहरुखने दिली आहे.
Thank u for your service to these families. Let’s keep the good work up and instil faith in them and ourselves too. There will be light at the end of this tunnel. Let’s get through together. We are glad @meerfoundation could be of service somehow. @pragyakapoor_ @ek7foundation https://t.co/rc3grmSZQy
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.