HW News Marathi
मुंबई

कुर्ल्यातील ‘शकिना मंजिल’ जीर्ण इमारत कोसळली

मुंबई | सलग पावसाच्या संततधार मुंबईतील कुर्ला स्टेशनजवळील संसार हॉटेल समोर असलेली इमारत कोसळी आहे. या इमारतीचे नाव शकिना मंजिल असून या इमारतीला १०० वर्ष जुनी अशी दुमजली इमारत आहे. या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

कुर्ला स्टेशनजवळील संसार हॉटेल समोर असलेली ही दुमजली इमारत आहे. एल वार्डमध्ये ही इमारत येते. पालिकेने या इमारतीला अतिधोकादायक इमारतींच्या यादीत ठेवले होते. दरम्यान गॅलरीचा भाग कोसळल्याचे कळताच पोलीस व पालिका कर्मचारी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज पुन्हा मध्य रेल्वेचा खोळंबा, खडवली स्थानकाजवळ रुळाला तडे

News Desk

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

Gauri Tilekar

मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रयत्न | विखे पाटील

News Desk