HW News Marathi
मुंबई

शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

मुंबई महागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे मुंबईतल्या सर्व खासदाराच्या घरा समोर आंदोलन पुकारलं होतं. चेंबुरमध्ये शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या घरा समोर हे आंदोलन होणार होतं. याच वेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली. तीथेच वादाची ठिणगी पडली.

या किरकोळ बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी दोन्ही बाजूनी जोरदार हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गर्दी पांगवली. सध्या या परिसरात कार्यकर्ते असले तरी तणावपूर्ण शांतता आहे. मात्र महागाईला शिसेनेचा विरोध आहे की पाठींबा याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण महागाई विरोधात शिवसेनाही रस्त्यावर उतरली होती मग या आंदोलनाला विरोध का अशी विचारणा आता होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेचा सलग तिसऱ्या दिवशी देखील खोळंबा

News Desk

पालघरच्या चांदीत रेती बंदरावर जिलेटीनसह स्फोटके सापडली

News Desk

छगन भुजबळ यांच्या प्रकृती बिघडल्यास सरकार जबाबदार | शरद पवार

swarit