HW News Marathi
मुंबई

शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटच्या अपघात १ जण बुडाल्याची भीती

मुंबई | शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटचा अपघात झाला आहे. नरीमन पॉंइट पासून २.६ किलोमीटरवर हा अपघात झाला असून ही बोट महाराष्ट्र सरकारची असल्याची माहिती मिळत आहे. या बोटीत २५ होते. या अपघातात १ जण बेपत्ता असून तो बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे गेलेल्या तीनपैकी एका स्पीड बोटीमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते होते.

अपघात झालेल्या स्पीड बोटीमध्ये पाणी गेल्याने ही बोट बुडाली आहे. बचाव दलाने घटनास्थळी येऊन बुडत असलेल्या स्पीड बोटीतील लोकांना आपल्या बोटीत घेतले स्पीड बोटीतील सर्वांना वाचविण्यात यश आल्याचे म्हटले जात असले तरी याविषयी नेमकी माहिती अद्याप मिळू शकली नाही. परंतु या अपघातात एक जण बुडाल्याची भीती मात्र व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐन उन्हाळ्यात राणीच्या बागेतील प्राण्यांचे हाल

swarit

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

News Desk

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

News Desk