HW News Marathi
मुंबई

सायन रुग्णालयातील डॉक्टर आज संपावर

मुंबई | दक्षिण मुंबईमधील जे जे रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणी सोमवारी सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी एक दिवसाचा सामूहिक संप पुकाराला आहे. शनिवार पासून जे जे रुग्णालयातील डॉक्टर संपवार आहेत. डॉक्टरांनी संप मागे घ्यावा यासाठी मंत्री गिरीष महाजन यांनी डॉक्टरांना आवाहन केले होते परंतु अद्याप हा संप मागे घेण्यात आलेला नाही.

रुग्णालयामधील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीने वाढविण्यात यावी यासाठी हा संप कायम ठेवण्यात आला आहे. संपादरम्यान कुठलीही अत्यावश्यक सेवा खंडीत होऊ देणार नाही, संप लांबल्यास आम्ही समांतर ओपीडी सुरु करु, अशी माहिती मार्डच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी रविवारी कँडल मार्च काढला होता. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाला आज सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी पाठींबा दर्शविल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेरीवाला संरक्षण कायदा त्वरित लागू करा – संजय निरुपम..

News Desk

चार कोटीसह व्हॅन घेऊन चालक फरार

News Desk

मीरा- भाईंदर महानगरपालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान

News Desk