HW News Marathi
मुंबई

सिद्धिविनायकाच्या दर्शनाने मुंबईकरांनी केली नववर्षाची सुरुवात

मुंबई | जगभरात नववर्षाची धूम धाम आणि आतीषबाजीमध्ये २०१८ला निरोप दिल्यानंतर २०१९ च्या स्वागताला सुरुवात झाली. मुंबईकरांसह राज्यातून न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या सेलिब्रेशननंतर आता, नववर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे.

मुंबईकरांच आराध्य दैवत आणि प्रसिद्ध गणेश मंदिर असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात नववर्षाची सुरुवात श्रींच्या आरतीने झाली. नववर्ष मंगलमय, आनंददायी आणि सुखकर जाण्यासाठी सुखकर्ता-दुखहर्ता विघ्नविनायकाच्या चरणी भक्तगण नतमस्तक झाले आहेत. ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन केल्यानंतरही गणरायाच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यास भक्तांनी गर्दी केल्याचे दिसून येते.

सिद्धिविनायकच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात

नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातून मुंबईत पर्यटक आले आहेत. तर नववर्षाची सुरुवात बाप्पांच्या आशिर्वादाने करण्याचा निश्चय मनाशी करून अनेक पर्यटक व मुंबईकर सिद्धिविनायक मंदिरात दाखल झाले आहेत. आज (१ जानेवारी) सकाळीच बाप्पांच्या चरणी लीन होऊन विशेष आरतीचा लाभ या भक्तजणांनी घेतला आहे. नववर्षानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रयागराज येथे गंगाआरतीने नववर्षाची सुरुवात झाली असून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात हरमंदिर साहिब यांच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतची गर्लफ्रेंड रियाला धमकी देणाऱ्या दोघांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

News Desk

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांची योगासने

News Desk

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल बफरला धडकून अपघात

News Desk