HW News Marathi
मुंबई

एसटी – टेम्पोच्या धडकेत नऊ ठार; १० गंभीर जखमी

पुणे एसटी आणि टेम्पोच्या भीषण अपघातात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नऊ ठार झाले आहेत. रस्त्याच्या कडेला कांद्याने भरलेल्या टेम्पोचे पंक्चर काढत असताना पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ भरधावएस.टी. बस टेम्पोवर आदळली. अपघातातील १० गंभीर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नारायणगाव येथील भीषण अपघातात एसटीचा चालक सुदैवाने वाचला. तर आयशर टेम्पो चालक, आयशर टेम्पोच्या मदतीसाठी थांबलेला ट्रकचालक यांचा मृत्यू झाला आहे. ट्रकचालक किशोर यशवंत जोंधळे (४०), आयशर ट्रकचा चालक रशीद गुलाब पठाण (३०), शोभा नंदू पगार (४५), यमुना भिला पगार (५५), संकेत दत्तात्रय मिस्त्री,विकास चंद्रकांत गुजराथी (५०), सागर कृष्णलाल चौधरी (२७),निकेत जोशी (२५) अशी यातील मृतांची नावे असूनएका महिलेची अद्याप ओळख पटली नाही.

त्र्यंबकेश्वर पुणे एसटीचा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये एसटीतील तीन महिला आणि चार पुरुष अशा सात प्रवशांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींची अवस्था पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ठाण्यातील पंचपाकडी येथील सीसीडी मध्ये आग

News Desk

श्रीमाणिकप्रभूंच्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम- आनंदराज प्रभू

News Desk

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान जी २० विकास कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन

Aprna
कृषी

गुळ क्लस्टरसाठी निधी देऊ – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

News Desk

कोल्हापूर : कोल्हापूरचा गुळ जगप्रसिद्ध असून गुळ क्लस्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बोलताना दिली.

मेक इन कोल्हापूर संकल्पनेंतर्गत सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार संध्यादेवी कुपेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

मेक इन कोल्हापूरसाठी उद्योजकांनी सक्रीय होऊन पुढाकार घ्यावा, शासन खंबीरपणे पाठीशी राहील, अशी स्पष्ट ग्वाही देऊन मुनगंटीवार म्हणाले, मेक इन महाराष्ट्रसाठी मेक इन कोल्हापूर बनविणे आवश्यक आहे. येथील औद्योगिक क्षेत्राला तसेच पर्यटनाला गती देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल. महाराष्ट्राची देशात उत्पादनामध्ये मोठी आघाडी असून महाराष्ट्रात उद्योगाचे स्वत:च क्लस्टर निर्माण केले आहे. राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात असे उद्योग विकसित करुन नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास करण्याचा ध्यास शासनाने घेतला असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

पर्यटन व्यवसायात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असल्याने राज्यात पर्यटनावर अधिक भर दिला जात आहे. कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी शासन कटिबद्ध असून यासाठीचे प्रस्ताव प्राधान्य क्रमाने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देऊन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेक इन कोल्हापूर ही संकल्पना यशस्वी करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चितपणे केल्या जातील. कोल्हापुरात जैव विविधता संशोधन केंद्राबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. कोल्हापुरच्या गुळाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच गुळासाठीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी आवश्यक लागणारा‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

Related posts

पुजारी दांपत्याची किमया, नापीक जमिनीत फुलवली ड्रॅगन फ्रुट्सची शेती

News Desk

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील – जिल्हाधिकारी डोंगरे 

News Desk