मुंबई | गेल्या तीन-चार दिवसापासून जोरादार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यानंतर मध्य रेल्वेने बुधवारी (३ जुलै) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे आज कामाला निघालेल्या प्रवासांनी प्रचंड हाल होत आहे. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून महिला, विद्यार्थी एकातासापेक्षा अधिक वेळ झाला असला तरी स्थानकात अडकून पडले आहेत.
Kindly note:
Suburban services of Mumbai Division will run as per Sunday timetable on 3.7.2019. pic.twitter.com/zI9dfmtTdn— Central Railway (@Central_Railway) July 2, 2019
या रेल्वे स्थानकांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रवाशाने ठाणे आणि डोंबिवली मुंबईसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. लोकलच्या गर्दीमुळे ट्रेनमधून उतरताना दोन महिलांना चक्कर आली असून रेल्वे स्थाकातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस प्लॅटफ्रॉमवर दाखल झाले आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तब्बल १२ तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाल्यानंतर ही प्रवाशांचे हाल होत आहेत.
.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.