HW News Marathi
मुंबई

रविवारी बाहेर जाताय… सावधान !

मुंबई | रेल्वेच्या रुळांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या डाउन धिम्या मार्गाच्या कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर आणि मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. तर पालघर स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंब्रा ते कळवा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूळ जोडणीबाबतचे काम करण्यात येणार आहे. यामुळे रविवारी १० तास अप धिम्या मार्गावरील वाहतुक अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. अप आणि डाउन मार्गावरील जलद लोकल फेऱ्यांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबा देण्यात येईल. ब्लॉकच्या वेळी कळवा आणि मुंब्रा स्थानकावरील प्रवाशांना ठाणे-दिवा स्थानकातून प्रवास करण्याची मुभा मध्य रेल्वेने दिली आहे.

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ब्लॉक काळातील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योजनांच्या लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी बँक खाते आधारशी जोडावे

News Desk

फेसबुकद्वारे ब्लॅकमेलिंग होत असल्यानं तरूणीची आत्महत्या

News Desk

मध्य, पश्चिमसह हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

Gauri Tilekar