HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेस पक्षाचं शिवसेनेत विलगीकरण झालयं का? निरूपमांचा काँग्रेसला सवाल

मुंबई | राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या पदावरून हटवल्या नंतर महाराष्ट्रामध्येही काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. पक्षविरोधी वक्तव्य आणि पायलट यांचे समर्थन केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते संजय झा यांना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निलंबित केले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांना पक्षातून बाहेर काढा अशी शिफारस मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस पक्ष आपल्या विरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण संजय निरुपम यांना लागली आणि त्यांनी पक्षावर टिकेची झोड उठवली. दरम्यान, संजय निरुपम यांनी ट्विट करत , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी केली. शिवसेनेच्या विरोधात बोलणं पक्षविरोधी कारवाया आहेत का? मुंबई काँग्रेसचे शिवसेनेत विलगीकरण झाले आहे का? असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला होता.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महाजाॅब्स पोर्टलबाहत ट्विटरवरून व्यक्त केलेल्या नाराजीवरुनही निरुपम यांनी भाष्य केले. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे असं ऐकलं ना? मग युवकांना रोजगार देणाऱ्या सरकारी जाहिरातीत काँग्रेस कुठे आहे? ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेवर अथांग प्रेम झालं आहे. त्यांना माझे प्रश्न आहेत. शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा पक्ष संपून जाईल असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेत येण्यासाठी आम्ही अनेक आश्वासने दिली | गडकरी

swarit

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील एखादं आसन सुचवा, अतुल भातकळकरांचा टोला

News Desk

महाराष्ट्रात आता भाजप एकट्याने लढेल, पुन्हा फसवणूक नकोय! – चंद्रकांत पाटील

News Desk