HW Marathi
मुंबई

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी 

मुंबई । लोकसंख्यांचा भार सहन करणाऱ्या शहरापैकी ठाणे ही देखील एक आहे. यामुळे वाहतुकीच्या समस्या सामोरे जावे लागते. परंतु या वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी वर्तुळाकार (रिंगरुट) मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (५ मार्च) मंजुरी दिली आहे. ठाणे महापालिका शहरात वर्तुळाकार मेट्रो बांधणार आहे. तिचा पहिला टप्पा २९ किलोमीटरचा असून त्याला ‘ठाणे अंतर्गत मेट्रो’ असे नाव देण्यात आले आहे. १० हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असणार आहे.
ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नवीन ठाणे ते जुने ठाणे यादरम्यान २९ किलोमीटरचा असणार आहे. यामध्ये २० उन्नत, तर दोन भुयारी अशी २२ स्थानके असणार आहेत. सुमारे १३ हजार ९५ कोटींच्या या प्रकल्पामुळे २०२५ पर्यंत दररोज सुमारे ५ लाख तर २०४५ पर्यंत साधारण ८ लाख ७२ हजार प्रवाशांची वाहतूक  करणे शक्य होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्पही मंजूर केला. या अहवालास राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. ठाणे शहरातील सर्व मेट्रो मार्गिकांच्या दरात एकवाक्यता राहावी म्हणून वर्तुळाकार मेट्रोचे दर हे मेट्रो ४ वडाळा- घाटकोपर- मुलुंड- ठाणे- कासारवडवली या मार्गिकेनुसार राहणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो)मार्फत करण्यात येईल. तसेच, हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

ही आहेत ठाणे मेट्रोतील स्थानके

नवीन ठाणे, रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्यनगर बस डेपो, शिवाईनगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटर फ्रंट, पाटलीपाडा, आझादनगर बस स्थानक, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे स्टेशन.

Related posts

‘नो पार्किंग’ प्रकरणानंतर महापौरांना मुंबई ट्रॅफीक पोलिसांकडून ई-चलन

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा जल्लोष

News Desk

संविधानाला हात लावाल तर खबरदार; देशातील विरोधीपक्ष नेत्यांचा संविधान बचाव रॅलीत इशारा

Ramdas Pandewad