HW News Marathi
मुंबई

‘सी’ वॉर्ड मधील ए.पी मंडईची जागा घशात घालण्याचा बिल्डरचा डाव

मुंबई | दक्षिण मुंबईत असलेल्या महानगरपालिका सी वॉर्ड धोबीतलाव येथील आदमजी पिरभाई मंडईची जागा महादेवराव शिंदे यांच्या मालकीची होती तिचा ४,६९,००० रुपये मालमत्ता कर थकीत राहील्याने ही जागा १९८२ मध्ये मुंबई महानगर पालिकेने हस्तगत केली.

मुंबई महानगपालिकेकडे इमारत उभारणीसाठी निधी नसल्यामुळे “पंतप्रधान अनुदान प्रकल्प” योजनेतून म्हाडाने मंडईची इमारत विकसीत केली स्थानिक भाडेकरुंना कायमस्वरूपी जागा देवून उरलेली जागा म्हाडा व पालिकेने विभागनी करुन घेतली स्थापीत एपी मंडईतील ४० वर्षापासून व्यापार करणा-या मराठी व्यापा-यांना पळवून लावण्याचा घाट घातला जात असून त्यांना दादर प्लाझा आणि नळबाझार येथे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र या निर्णयाला स्थानिक व्यापा-यांचा तीव्र विरोध असून व्यापा-यांचा विरोध मोडीत काढून त्यांना पळवून लावण्यासाठी विज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे षडयंत्र रचल्याचे पहायला मिळत आहे.

धोबीतलाव एपी मंडई चा विज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडीत करत पालिकेच्या तांत्रिकी विभागाने ही इमारत धोकादायक ठरवून एपी मंडई बिल्डरांच्या घशात घालण्याच्या डाव आहे स्थानिक व्यापरीवर्गावर अन्याय होत असल्याची प्रतिक्रीया मंडईतील व्यापा-यांनी दिली आहे. एपी मंडईच्या इमारत दुरस्तीला खर्च झालेला असताना इमारत धोकादायक कशी बनली. इमारत धोकादायक असताना करोडो रुपये दुरुस्तीला खर्च का करण्यात आला मंडई दुरुस्तीसाठी केलेला खर्च गेला कुठे असे सवाल करत इमारत धोकादायक असल्याचे ठरवणा-या अधिका-यांच्या निर्णायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुनर्विकासाच्या नावाखाली मोक्याच्या ठिकाणाची जागा बिल्डराच्या घशात घालण्याचा डाव नाही ना असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

एपी मंडईतील गाळेधारकांचा विजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्यामागे पालिकेचे षडयंत्र असून सर्व इमारत धोकादायक असताना फक्त व्यापारी गाळ्यांची विज आणि पाण्याची कनेक्शन तोडून उर्वरित इमारतीला अभय देण्यात आल्याचे दिसून येत आहे. एपी मंडई च्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे अशी मागणी स्थानिकांनी केली होती त्या प्रमाणे पालिका तांत्रिकी विभागाने माती परीक्षण करत आणि हातोड्याच्या सहाय्याने ठोकुन भींतीची तपासणी केली असता ही इमारत धोकादायक असल्याचा खुलासा पालिका अधिका-यांकडून करण्यात आला आहे तर एपी मंडई चे विज आणि पाणी तोडणे हे एक षडयंत्र आहे ही जागा बिल्डरांच्या घशात घालुन व्यापा-यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप व्यापारी वर्गातून होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

News Desk

भारतात मांसाहार बंदी केल्यास भूकबळी – जितेंद्र आव्हाड

News Desk

मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली शस्त्रांची पूजा

News Desk