HW News Marathi
मुंबई

महापालिका अधिकारी बिल्डरच्या खिशात?, करीरोडचा पूल धोक्यात

मुंबई | कारीरोड येथील महादेव पालव मार्गा लगत असलेल्या कारीरोडचा हेरिटेज पूल तोडण्याचे कारस्थान महापालिकेने सुरु केले आहे. वन अविघ्न पार्क इमारतीच्या प्रवेशद्वारासाठी करी रोड स्थानक हेरिटेज पूल १० फूट तोडण्याच कटकारस्थान करत असतांना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर स्थानिकांनी विरोध केला. परवानगी नसताना देखील काम करत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी अडविले. यावेळी अधिकारी नितीन जाधव यांनी स्थानिकास उलट उत्तरे दिली. ‘ माझ्यवर गुन्हा दाखल केला तरी चालेल. ‘ अश्या शब्दात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वन अविघ्न पार्क इमारतीचे बिल्डर अग्रवाल यांच्या 32 मजली इमारतीमध्ये गाड्यांना जाण्यास त्रास होतं असल्यामुळे हे कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप ही स्थानिकांनी केला. यावेळी स्थानिकांनी परवानगी असल्याचे देखील विचारले ? हेरिटेजची परवानगी आहे का? तुम्हला बिल्डरने किती पैसे दिले असे अनेक प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केले.

महादेव पालव मार्गवर वन अविघ्न पार्क इमारत आहे. या 32 मजली इमारती समोरील कारीरोड पुलाच्या सुरुवातीचा खांब प्रवासात अडथळा निर्माण करत आहे. तसेच ह्या पुलाचा भाग धोकादायक असल्यामुळे तोडून १० फूट मागे घेणार असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले.

काय म्हणाले एफ/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त ?

मला याबाबत काही माहिती नाही. संबंधित घटनेची चौकशीकरून तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती पुरविण्यात येईल. यावेळी सदर घटनेची पाहणी किशोर देसाई, सहाय्यक आयुक्त एफ/ दक्षिण विभाग यांनी केली. त्यांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला. तसेच या घटनेची चौकशी केल्यानंतर यावर बोलेन असे ही सांगितले.

ही सर्व बिल्डची खेळी आहे. त्याच्या बिल्डिंगमध्ये येणाऱ्या गड्याने अडथळा निर्माण होत असल्यामुळे त्याने हे कृत केले आहे. 100 वर्ष जुना पूल आहे हा आणि तो धोकादायक असल्याचे कर्मचारी सांगतायत. यांच्याकडे परवानगी नाही तरी हा खांब तोडला. असे स्थानिक नागरिक सुनील तांबे यांनी सांगितले.

वन अविघ्न पार्क इमारतीच्या प्रवेशद्वारा समोरील या कारीरोड पुलाच्या खांबाचा बिल्डरला त्रास होत असल्यामुळे बिल्डरने वरून दबाव आणून 100 वर्ष जुन्या पुलाचा भाग पडण्याचे काम केले. तसेच आज लोअर परेलचा पूल बंद करण्यात आला. तर सर्वांचे लक्ष तिथे असतानाच हा डाव साधून बिल्डरने पालिका कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी बिल्डरच्या डाव मोडून लावला. असे मनसेचे स्थानिक शाखाअध्यक्ष मारुती दळवी यांनी एच डब्लूला माहिती देताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण

News Desk

“नानाजी काय तुमची अवस्था?”, भाजपचा खोचक सवाल

News Desk

पद्मावत सिनेमाला मनसेकडून पाठिंबा असल्याची अफवा

News Desk