HW News Marathi
मुंबई

‘साई संस्थेचा’ प्लास्टिक बंदीला मोलाचा हातभार

मुंबई | प्लास्टिक बंदी होऊनही बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना सर्रास पहायला मिळत आहे. आपली सामाजिक बांधिलकी जपत ‘साई’ म्हणजेच सोशल ऍक्टिव्हीटीज इंटिग्रेशन या संस्थेने नुकतेच विद्यार्थ्यांना कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

संजना गजाकोश यांनी या मुलांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व समजावून सांगत सोप्या पद्धतीने कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त, अरविंद पाटील, आनंदीता पेडामकर हेदेखील या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

“प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजवायची असेल तर सुरुवात ही शालेय विद्यार्थ्यांपासुनच करायला हवी. कारण प्रत्येक नवी पिढी देशाचं भवितव्य ठरवते”. असे ’संजना गजाकोश’ म्हणाल्या.

“बदलत्या काळाचा वेग पकडत आपणही नवे बदल स्वीकारायला हवेत. हाच विचार आम्ही या वंचित घटकातील मुलांना देत असतो. जनजागृती करण्यासाठी ‘साई संस्था’ नेहमीच नवे उपक्रम राबवत असते. म्हणूनच यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संतुलनाविषयी सजगता आणण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. समाजप्रबोधनासाठी यापुढेही अशाच नवनवीन उपक्रमात आम्ही सक्रीय राहू”. असे साई संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गिरगावच्या कोठारी हाऊस इमारतीला आग

swarit

Dahi Handi | आयडियलची इकोफ्रेंडली दहीहंडी, पारंपरिक वाद्य वाजविण्याचा दिला संदेश

News Desk

“बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…”,अर्थसंकल्पावर ‘मविआ’च्या आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Aprna
मुंबई

विहिरीचा कठडा तुटून एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू

News Desk

मुंबई | विलेपार्ले येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही महिला मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ जमल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस हजर झाले. विहिरीत पडलेल्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

सदर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. माधवी पांडे (वय – ४९), रेणू यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावे आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिलांना वाचविण्यात यश आले आहे.

Related posts

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार दिवाळीचा बोनस

News Desk

दिवाळीनिमित्ताने मेगाब्लॉक रद्द

News Desk

खंबाटा एव्हिएशनच्या कर्मचार्‍यांचे अनिश्चित कालीन उपोषण

Gauri Tilekar