HW News Marathi
मुंबई

रेल्वे प्रशासनच जबाबदार, छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून मुलीने मारली उडी

मुंबई अल्पवयीन मुलीने छेडछाडच्या भीतीने चालत्या लोकल रेल्वेमधून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी 9.30 वाजता घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थीत झाला आहे. महिलांच्या डब्यात पोलिस कर्मचारी नसल्यानेच ही घटना घडली. महिला डब्यात गार्ड असला असता तर ही घटना घडली नसती.अनेकदा अश्या घटना घडूनही रेल्वे प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

रविवारी घडलेल्या घटनेत मुलगी चालत्या ट्रेनमधून जर उडी मारली यात ती जखमी झाली. सुदैवाने ती सुखरूप आहे. जर ती उडी मारली नसती आणि तिच्यावर अत्याचार झाला असता ? याला कोण जबाबदार असला असता ? असे घटना अनेकदा घडूनही रेल्वे प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

रविवारी सकाळी सीएसएमटी ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. आठवीच्या वर्गात शिकणारी ही मुलगी सीएसएमटीहून कल्याण लोकलने परळला क्लाससाठी जात होती. रविवार असल्याने लोकलचा महिला डबा रिकामा होता. त्यावेळी एक पुरुष अचानक महिला डब्यात चढला. या मुलीने त्याला उतरण्यास सांगितले मात्र त्याने तिला धमकावत शांत बसण्यास सांगितले. त्यामुळे मुलीने घाबरून लोकलमधील चैन ओढण्याचा प्रयत्न केला. पण, लोकल थांबली नाही. रुळावर गँगमन काम करत असल्याचे तिला दिसले. लोकलचा स्पीड कमी झाल्याने मुलीने धावत्या लोकलमधून उडी मारली. गँगमनने या मुलीला उडी मारताना पाहिल्यावर त्यांनी लगेच धावत गेला तिला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझे ठाणे’ ही भावना लक्षात ठेवून स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे! – मुख्यमंत्री

Aprna

मुंबई महापालिका निवडणूक फ्रेंडली मॅच नाही, ही अस्मितेची लढाई; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

News Desk

३० एप्रिल पर्यंत शाळा सुरु ठेवण्याचे पत्रक मागे

News Desk