HW News Marathi
मुंबई

महापालिका शाळेतील गरीब, गरजवंत व कर्तबगार विद्यार्थ्यांची परदेश वारी

मुंबई | बृहन्मुंबई महानगर पालिका शाळेतील गरीब व गरजवंत कर्तबगार मुले भूतान येथे दिनांक १९ मे २०१८ ला होणाऱ्या कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात आहेत. राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने शनिवार दिनांक १९ मे २०१८ ला सावरकर सदनात सावरकरांना अभिवादन करून मग त्या मुलांनी सावरकरांच्या स्नुषा सुंदर सावरकर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महानगरपालिकेचे जी उत्तर विभाग चे सहाय्यक आयुक्त खैरनार, घन कचरा विभागाचे अधिकारी तानाजी घाग यांनी वेळात वेळ काढून मुलांना आशीर्वाद दिले.

राष्ट्राभिमानी समितीच्या सदस्य व पालिका शाळेच्या शिक्षिका मीनल मालवणकर यांनी या मुलांसाठी अथक मेहनत घेतली असून त्यांना प्रशिक्षक नितिन कदम आणि संतोष खंदारे यांची साथ लाभली. सर्व मुलांना व प्रशिक्षकांनी सुंदर सावरकर आणि महापालिका जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त खैरनार यांच्या हस्ते फुले देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्या मुलांच्या भुतान ला जाण्याचा खर्चाचा धनादेश समितीच्या वतीने सुंदर सावरकर ,सहाय्यक आयुक्त खैरनार ,मिनालताई आणि विलास फडके यांच्या हस्ते प्रशिक्षक नितीन कदम यांना सुपूर्द करण्यात आला. यापुढेही आम्ही गरजवंत मुलांना सर्वोतोपरी सहकार्य करत राहू असे समितीचे सदस्य प्रशांत पळ यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लंडनच्या राजकुमाराच लग्न, मुंबईत डबेवाल्यांनी केलं सेलिब्रेशन

News Desk

पोलिस अधिका-याची दादागिरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk