HW News Marathi
मुंबई

‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, सामनातून भाजपावर टीका

मुंबई | अहमदनगर जिल्ह्यातील केडगावमध्ये राजकीय वैमनस्यातून दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारीत उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला. सुवर्णनगर परिसरात भर चौकात गोळ्या झाडल्या, आरोपी गोळीबार करुन फरार झाले. संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला आहे.

सामना संपादकीयत

नगर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून लवकरच जाहीर होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. ‘संतांची भूमी’ अशीही नगर जिल्हय़ाची ओळख आहे. साईबाबांचे शिर्डी नगर जिल्हय़ातच येते व जगभरातून लाखो भाविक, पर्यटक नगर जिल्हय़ात येत असतात, पण गेल्या चार दिवसांपासून ‘नगर’ गाजते आहे ते तेथील हिंसाचारामुळे, राजकीय दहशतवाद व त्यानंतर झालेल्या हत्याकांडांमुळे. हे प्रकरण देशभर गाजत आहे. त्यामुळे नगर वेगळ्या अर्थाने पर्यटन क्षेत्र झाले आहे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे ‘बाप-बेटे’ आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप हे नवे ‘संतमहात्मे’ उदयास आले आहेत. वाल्याचा शुद्ध वाल्मीकी करण्याचा जोडधंदा २०१४ पासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सुरू केला. त्या उद्योगाची निर्मिती म्हणून ‘संत’ शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाहावे लागेल. नगर जिल्ह्यातील केडगाव येथे संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांचे दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून झाले. संतांची भूमी रक्ताने भिजली. जिल्ह्यात प्रचंड दहशत निर्माण झाली. हत्या झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह पाच-सहा तास जागेवरच पडून होते, पण पोलीस पोहोचले नाहीत. वातावरण पेटू लागले तेव्हा पोलीस पोहोचले. या प्रकरणात तीन आमदार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधि व न्याय विभाग उच्च न्यायालयात माहिती तंत्रज्ञानासंबंधी दोन पदांच्या निर्मितीस मान्यता

News Desk

उल्हासनगरमध्ये वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर धाड, तिघांना अटक

News Desk

माझा मित्र येतोय,फडणवीस

News Desk