HW News Marathi
मुंबई

मुंबईत तीनशे किलो टोमॅटोवर दरोडा!

मुंबई : बाजारातील महागड्या वस्तूंची चोरी होते. टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा तिकडे वळविला होता. दहिसरमध्येचोरट्याने चक्क तीनशे किलो टोमॅटोची लुटून नेले होते. तब्बल महिनाभराच्या शोधानंतर दहिसर पोलिसांनी या चोरट्याच्या कुर्लातून मुसक्या आवळल्या आहेत. त्यावेळी बाजारात टोमॅटोला मोठी मागणी असल्यामुळे ही चोरी केल्याची कबूली त्याने दिली आहे.

शांतीलाल श्रीवास्तव यांचा दहिसर मार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वीच श्रीवास्तव यांनी नवी मुंबईतील घाऊक व्यापाऱ्याकडून ३०० किलो टोमॅटो विकत घेतले होते. हे टोमॅटो त्यांनी दुकानात उंदरांचा प्रादुर्भाव असल्याने दुकानाबाहेर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे टोमॅटो बाजारात विक्रीला नेणार होते. मात्र, घराबाहेरील टोमॅटोचे क्रेट सकाळी गायब झाल्याची तक्रार शांतीलाल यांनी दहिसर पोलीस ठाण्यात दिली होती. दहिसर पोलिसांनी एक महिन्याच्या प्रयत्नांनंतर आरोपी टेम्पोचा चालक चंद्रशेखर गुप्ता (५४) याला अटक केली आहे. त्याला १८ ऑगस्टपर्यंत पोलीसकोठडी सुनावण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर…

News Desk

मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामाला अखेर उच्च न्यायालयाची परवानगी

Gauri Tilekar

जय फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेचे 75 आठवडे, इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा दिला संदेश

News Desk